पिछला पृष्ठ


नियम व् शर्तें




सूचना का अधिकार अधिनियम 2005 | संस्कृति परिषद् नियमावली एवं संविधान |

 संस्कृति परिषद् - संविधान एवं नियम (वर्ष -2002)  | सूचना का अधिकार (17 बिन्दु मैन्युअल)

अकादमीचे स्वरूप

मराठी साहित्य अकादमी, मध्यप्रदेश संस्कृति परिषद 

मध्यप्रदेशाची स्थापना व त्याही पूर्वीपासून या क्षेत्रात मराठीभाषिकांचे विशेष महत्व होते. पूर्वीच्या मध्यभारतापासून ते मध्यप्रदेशाच्या स्थापनेच्यावेळी पूर्व राजधानी नागपुरहून 

बदली होऊन आलेले मराठी भाषिक, ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यामुळे ग्वाल्हेर,इन्दूरच्या होळकर घराण्यामुळे इन्दूर व जवळच्या क्षेत्रात, सागर च्या गोविंद पंत बुंदेला( खेर) घराण्या मुळे सागर व जवळपास बरीच मराठी कुटुम्ब नांदत होती.त्याच प्रमाणे जबलपुर येथे मोठी शासकीय कार्यालये असल्या मुळे इथे बरीच लोकसंख्या मराठी भाषिकांची होती.महाराष्ट्राच्या सीमेलागत छिंदवाडा, सौसर, 

मुलताई, बैतुल, खांडवा, बुऱ्हाणपूर   इत्यादी क्षेत्रात मराठीभाषिकांची लोकसंख्या फार मोठी आहे. हे बघता मराठी संस्कृति जोपासण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी

 पूर्वी मध्यप्रदेश संस्कृति परिषदेच्या अंतर्गत मराठी प्रभाग स्थापन केला गेला होता. प्रभागाचे विस्तृत कार्यक्षेत्र बघता सन् 2010 मध्ये शासनाने संस्कृति परिषदेच्या अंतर्गत स्वतंत्र 

अशी मराठी साहित्य अकादमी ची स्थापना केली. अकादमी आता अव्याहतपणे वा जोमाने वेगवेगळया कार्यक्रमांद्वारे मराठी संस्कृति व भाषेच्या संवर्धनाचे कार्य करीत आहे. नवीन तंत्रज्ञानाला अनुसरून अनेक दृश्य श्राव्य माध्यमातून अकादमी आपले कार्य करीत आहे. फेसबुक , यू ट्यूब आदि माध्यमे खाली दिली आहेत.


आपण सर्वांना विनंती आहे की आपण परस्पर संपर्क ठेवावा व आपली भाषा, संस्कृति अक्षुण्ण ठेवण्यात आपणास यश यावे.


मराठी साहित्य अकादमी मेल आयडी 

marathiacademy@gmail.com


मराठी साहित्य अकादमी फेसबुक पेज- Click Here


मराठी साहित्य अकादमी इंस्टाग्राम- Click Here