बातम्या

आगामी : संतवाणी - लिवामांच - मराठी लोक रंगयात्रा

मराठी साहित्य अकादमी

अकादमीचे स्वरूप

मराठी साहित्य अकादमी

मध्यप्रदेशाची स्थापना व त्याही पूर्वीपासून या क्षेत्रात मराठीभाषिकांचे विशेष महत्व होते. पूर्वीच्या मध्यभारतापासून ते मध्यप्रदेशाच्या स्थापनेच्यावेळी पूर्व राजधानी नागपुरहून बदली होऊन आलेले मराठीभाषी, ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यामुळे ग्वाल्हेर, सागर व इन्दूरच्या होळकरघराण्यामुळे इन्दूर व आसपास, महाराष्ट्राच्या सीमेलागत छिंदवाडा, सौसर, मुलताई, बैतुल, खांडवा, बुऱ्हाणपूर इत्यादी क्षेत्रात मराठीभाषिकांची लोकसंख्या फार मोठी आहे. हे बघता मराठी संस्कृति जोपासण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी पूर्वी मध्यप्रदेश संस्कृति परिषदेच्या अंतर्गत मराठी प्रभाग स्थापन केला गेला होता. प्रभागाचे विस्तृत कार्यक्षेत्र बघता सन् 2010 मध्ये शासनाने संस्कृति परिषदेच्या अंतर्गत स्वतंत्र अशी मराठी साहित्य अकादमी स्थापन केली. अकादमी आता अव्याहतपणे वा जोमाने वेगवेगळया कार्यक्रमांद्वारे मराठी संस्कृति व भाषेच्या संवर्धनाचे कार्य करीत आहे.

फोटो गैलरी

महत्वपूर्ण लिंक्स